सोलापूर महानगरपालिका सोलापूर
इंद्रभुवन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वेलाईन सोलापूर-413001
सार्वजनिक आरोग्य अभियंता यांचे कार्यालय
ई मेल : smcphewtr@gmail.com टेलिफोन नं :-०२१७-२७४०३५०

 
 
            पिण्याच्या पाईपलाईन मंजूरीबाबत ३% सुपरव्हिजन चार्जेस भरून घेतानाचे शर्ती व अटी
 
 
1) आपण नमूद अभिन्यासपर्यंत पाईपलाईन घालतांना डांबरी रस्ता नादुरुस्त झाल्यास सदरचे रस्ता दुरुस्त करणेचे अट हे दुरुस्तीचा खर्च अर्जदार यांनी स्वतः करणेचा आहे. लेआऊट अंतर्गत काम चालू करतांना पाईप पुरवठा, स्पेशल्स व स्लुईस व्हॉल्व अंतरणेचे वेळी Geo Tag फोटो काढावे

2) आपण नमूद अभिन्यास लेआऊट अंतर्गत DIK-7 150 व 100 मिमि व्यासाची पाईप लाईन स्वखर्चाने मनपाचे देखरेखीखाली घालणेचा असून ते पूर्ण केलेनंतर त्याप्रमाणे म.न.पा.स लेखी कळवून त्याचा पूर्णत्वाचा दाखला घेवून सदर घालण्यात आलेली पाईप लाईन सो.म.न.पा. हस्तांतरीत करणेची आहे. तसेच हस्तांतरण करणेची कालावधी पर्यंत दैनंदिन देखभाल दुरुस्तीचा खर्च अर्जदार यांनी स्वतः करणेचा आहे.

3) लेआऊट अंतर्गत पाईपलाईन पूर्ण केलेनंतर त्यावरुन संस्थेमधील सभासदांना सो.म.पा. मार्फत नियमाप्रमाणे डिपॉझीट व कोटेशन रक्कम भरुन घेवून प्लॉटधारकांच्या मागणीनुसार नळ कनेक्शन देणेचे आहे. तसेच परस्पर नळ कनेक्शन घेतल्याचे निदर्शनास आलेस अर्जदार व संबंधित नळधारक यांचेवर मुं. प्रां. अधिनियम 1949 अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

4) कांही अपरिहार्य अथवा तांत्रिक कारणास्तव अथवा वितरण व्यवस्था विस्तारामुळे पाणी कमी प्रमाणात आलेस अर्जदार अथवा तेथील धारक यांची तक्रार राहणार नाही.

5) सदर लेआऊट अंतर्गत रस्त्यावरील नियोजित पाईपलाईन याबाबत नळधारकांना कनेक्शन दिलेनंतर व सदरची पाईपलाईन ही म.न.पा.च्या मुख्य पाईपलाईन जोडणी करणेपूर्वी अंतर्गत पाईपलाईन ही तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची खात्री करुनच म.न.पा. मार्फत जोडणीस परवानगी देण्यात येईल. म.न.पा.च्या मुख्य पाईपलाईनला परस्पर जोडणी करता येणार नाही , तसे केल्यास संबंधित मिळकतदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल हे मिळकतदारास मान्य आहे.

6) आपण नमूद अभिन्यासपर्यंत पिण्याची पाण्याची पाईपलाईन स्वखर्चाने मनपाचे देखरेखीखाली घालणेची असून ती पूर्ण केलेनंतर त्याप्रमाणे म.न.पा.स लेखी कळवून त्याचा पूर्णत्वाचा दाखला घेवून सदर घालण्यात आलेली पाईपलाईन सो.म.पा.स हस्तांतरित करणेची आहे. तसेच हस्तांतरण करणेच्या कालावधीपर्यंत देनंदिन देखभाल दुरुस्तीचा खर्च अर्जदार यांनी स्वतः करणेचा आहे.


7) आपण म.न.पा.चे नळ कनेक्षनला इलेक्ट्रीक पंप डायरेकट बसवून पाणी खेचणार नाही. अर्जदार नळातून इतर जागेत अनाधिकृत व गैरमार्गाने पाणी देणार नाही. जर तपासणीमध्ये नळास इलेक्ट्रीक पंप बसविलेचे निदर्शनास आल्यास त्यावेळी सदरचा पंप जप्त करण्यास व कायदेशीर कारवाई करण्याचा म.न.पा.स पूर्ण अधिकार राहील. त्याबाबत अर्जदार कोणतेही तक्रार करणार नाही.


8) तसेच सदर DIK-7-150 व 100 मिमि व्यासाची पाईपलाईनवरुन त्या परिसरात आजू-बाजू राहत असलेल्या नागरीकांनी नळ कनेक्शन मागणी केल्यास त्याबाबत आपण कोणतीही तक्रार करणार नाही व कनेक्शन देणेस हरकतही घेणार नाही किंवा त्याबाबत कोणतीच तक्रार म.न.पा.कडे करणार नाही.


9) सदर लेआऊट नजीक मनपाची अस्तित्वात पाण्याची पाईपलाईन नसल्याने अर्जदार यांनी फक्त लेआऊट अंतर्गत पाण्याची पाईप लाईन घालणेचे मंजुरी मागणी केली आहे.


10) तथापी सदर ठिकाणी मनपाची भविष्यात पाण्याची पाईपलाईन लेआऊटच्या नजीकच्या ठिकाणी आल्यास यापूर्वी लेआऊट अंतर्गत घालणेत आलेले पिण्याची पाईप लाईन मनपाच्या मुख्य लाईनला जोडणे पूर्वी मनपा कडे रीतसर अर्ज करून म.न.पा. मुख्य पाईप लाईन जोडणी चार्जेस फी व तसेच म.न.पा. चे पाण्यावरुन Hydraulic testing व वॉशआऊट करीता चार्जेस फी भरूनच जोडणी करणे बंधनकारक राहणार आहे.


11) सादर ठिकाणच्या जागे वरील व उपलब्ध पाण्याचा विचार करुन अंतर्गत घालण्यात येणा-या पाण्याची पाईपलाईन जोडणी करणे बाबत अलहिदा कार्यवही करण्यात येईल. त्याबाबत अर्जदार कोणतेही तक्रार करणार नाही.


12) तसेच लेआऊट, काम पूर्ण केल्या नंतर, काम पूर्णत्वा बाबत रितसर इकडिल कार्यालयाकडे अर्ज करावे. तसेच सदर अर्जा सोबत जागेवर केलेल्या बाबतचे फोटो जोडावे. मंजूर लेआऊटवर घालण्यात आलेली पाईपलाईन व बसविण्यात आलेली स्लुईस व्हॉल्व नकाशावर दर्शविण्यात यावे.


13) पाईप लाईनचे काम नकाश्या मध्ये दर्शविल्या प्रमाणे काम करावे. तसेच लेआऊट अंतर्गत पाईप लाईनचे काम पूर्ण झाले नंतर लेआऊट अंतर्गत रस्ता काम करणे पुर्वी ते पुर्णत्वाचा दाखला मिळणेच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावा. तसेच काही बदल कराव्याचे असल्यास त्या बाबत इकडिल कार्यालयाकडे फेर प्रस्ताव सादर करावा. तसेच पाईप लाईन टाकताना जागे बाबत काही वाद उद्भवल्यास ते आपण स्वतः मिटवणेचा आहे.


14) तसेच र.रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर करारपत्र करुन द्यावे. तदूनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. क.दि. /07/2025. सार्वजनिक आरोग्य अभियंता सोलापूर महानगरपलिका सोलापूर

 
 
                            
 
                                                                                                                                                                                        सार्वजनिक आरोग्य अभियंता
                                                                                                                                                                                सोलापूर महानगरपलिका सोलापूर